खरतर ताप हा “आजार’ नाही, तर ते केवळ आजाराचे एक लक्षण आहे. बहुतेक आजारांमध्ये कमी-जास्त प्रमाणात ताप येतच असतो. तापामध्ये सगळ्याच शारीरिक व्यवहारांवर बंधन येत असल्यामुळे “काहीही करून प्रथम ताप कमी करा’ असा आपण विचार करत असतो. चला तर जाणुन घेउयात.
तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.
तुळस घालून केलेला चहा प्यायल्यानेही ताप लवकर उतरतो.
ताप आल्यावर जीभ पांढरी होऊन आपल्याला भूक लागत नाही. अश्या वेळी मध घालून तुळशीच्या पानांचा अर्धा चमचा रस सकाळ संध्याकाळ घ्यावा. याने तोंडाला चव येईल आणि भूक लागेल.
पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
खुप ताप असल्यास कपाळावर मिठाच्या पानाच्या किंवा थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्या, हात पायाला कांद्याचा रस चोळावा. ह्या उपायाने ताप बरा होण्यास मदत होते. तरीही ताप कमी न झाल्यास थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे.
आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जातो.
थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुक़डा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.
कांद्याचा रस घेतल्याने जुनाट ताप देखील कमी होतो. थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं
शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) चांगली राहील याकडे लक्ष पुरवावे. अधूनमधून थोडे थोडे पाणी पीत राहावे.
आम्ही आमच्या पद्धतीने काही घरगुती उपचार सांगितले आहेत. त्यामुळे जर आपला ताप कमी होत नसेल, तर आपल्याला लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे.
Diwali 2019 Rangoli Designs: दिवाळी हा रोषणाईचा सण मानला जातो. भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणार्या या सणामध्ये दिव्यांची आरास, फटाके, नवीन कपडे आणि भेटवस्तू यांची रेलचेल असते. भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासून घराबाहेर अंगणात सुरेख रांगोळी काढली जाते. तसेच दिवाळीला रांगोळीचे विशेष महत्त्व असते. विशेषत: फुले, पाने आणि दिव्यांचा वापर करून महिला आकर्षक रांगोळी काढतात. यंदा दिवाळीमध्ये तुमच्या घरासमोर कोणती रांगोळी काढायची? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, खाली दिलेले व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ठिपक्यांची रांगोळी काढू शकता.
दिवाळीतला फराळ जसा रेडिमेड झाला तसेच आता रेडिमेड रांगोळ्याही बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. फ्लॅट संस्कृतीत घरासमोर मिळणारी मर्यादित जागा लक्षात घेता बहुतांश महिला ॲक्रेलिक रांगोळ्या घेण्यास पसंती दर्शवत आहेत. विविध रंगी मिनाकारी, कुंदन, खडे, मोती, लेस, चमकीचा वापर करून बनवण्यात येणाऱ्या लहान आकारातील ॲक्रेलिक रांगोळ्या १५० रुपयांपासून ते मोठ्या आकारातील २ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
रांगोळी 1
रांगोळी 2
रांगोळी 3
रांगोळी 4
महालक्ष्मीची पाऊले काढण्यासाठी टिप्स
पूर्वी अंगणामध्ये गेरूच्या सारवणावर दिमाखात सजणारी रांगोळी चाळीमध्ये प्रत्येकाच्या दारात मिळेल त्या जागेत आकार घेताना दिसायची. चाळीची जागा गृहसंकुलांनी घेतली आणि घरे जाऊन फ्लॅट संस्कृती आली. तसे घरासमोरच्या अंगणाची जागाही हळूहळू कमी होत गेली. त्यामुळे ठिपक्यांच्या रांगोळीला ॲक्रेलीक रांगोळ्यांचा पर्याय समोर आला. रांगोळी काढता न येणाऱ्यांसाठीदेखील हा पर्याय उपयुक्त ठरू लागला. आकर्षक रंगसंगतीत तसेच हाताळण्यासही सुलभ असल्याने या रांगोळ्यांना महिलांची पसंती मिळत आहे.
ॲक्रेलिकबरोबरच वूडन रांगोळी, वूडन स्टेन्सिल्सही बाजारात उपलब्ध आहेत. याबाबत विक्रेत्या जया कोकणे यांनी सांगितले की, रेडीमेड रांगोळ्या दारासमोर, टीपॉयवर, कॉर्नर पीस म्हणूनही ठेवता येतात. शिवाय या रांगोळ्या व्यवस्थित स्वच्छ करून ठेवल्यास वर्षानुवर्षे वापरताही येतात. याव्यतिरिक्त नेहमीचे बाजारात प्लास्टिकचे लक्ष्मीच्या पावलांचे, स्वस्तिक, कुयरी व इतर रांगोळ्यांचा डिझाईन्सचे छापही पाहण्यास मिळतात. हे छाप ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
संस्कारभारती रांगोळीचीही क्रेझ
महिलांमध्ये संस्कारभारती रांगोळीची क्रेझ अजूनही कायम असून, रांगोळी शिकण्यासाठी महिलांची उत्सुकता दिसून येते. कमी जागेपासून मोठ्या आवारातही ही रांगोळी काढता येते. त्याकरता आवश्यक चाळणी, कागदी कोन किंवा फनेल, रांगोळीचा पेन अशा वस्तूही बाजारात पाहण्यास मिळत आहेत. हे पेन २० रुपयांपासून उपलब्ध आहेत. तसेच पेन, छाप, गालीचा पट्टा, रोलर, रंगीत पट्टा पेन अशा वस्तू असलेली किट २५० रुपयांपासून उपलब्ध आहे.
रांगोळी ही नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिकतेचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक आध्यात्मिक कार्याचं रांगोळी ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणून प्रत्येक यज्ञाच्या किंवा पूजेच्या ठिकाणी वेदीसाठी आधी रांगोळी काढली जाते. फार पूर्वीपासून खेडय़ापाडय़ात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी रेखाटण्याची प्रथा आहे. आजही शहरी भागात काही ठिकाणी गृहिणी आवर्जून रांगोळी काढतात. असं म्हणतात की, रांगोळी घरात येणाऱया अशुभ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. तसंच काहीसं शुभकार्याच्या बाबतीतही आहे. पण आता रांगोळी काढण्यामागे हे एकमेव कारण राहिलं आहे, असं नाही. तर महाराष्ट्रात नववर्षाला म्हणजेच गुढीपाडव्याला स्वागत यात्रांमध्ये रांगोळीचे गालिचे घातले जातात. या रांगोळीचं आयुष्य अगदी काही क्षणांचं असलं तरी त्यामागील भावना महत्त्वाची.
भारतातील हिंदू समाजात रूढ असलेला एक पारंपरिक कलाप्रकार, पांढरी भुकटी किंवा पूड यांचा उपयोग करून जमिनीवर हाताने काढलेला आकृतिबंध म्हणजे रांगोळी होय.
मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. ती राजस्थानात ‘मांडणा’ ‘सौराष्ट्रात’ ‘सथ्या’, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ‘चौकपूरना’ किंवा ‘सोनारख्ना’, आंध्र प्रदेशात ‘मुग्गू’, बिहारमध्ये ‘अरिपण’ अथवा ‘अयपन’, तमिळनाडूमध्ये ‘कोलम’, केरळात ‘पुविडल’, ओरिसात ‘झुंटी’, बंगालमध्ये ‘अलिपना’ आणि गुजरातमध्ये ‘साथिया’, कर्नाटकात ‘रंगोली’ व महाराष्ट्रात ‘रांगोळी’ या नावांनी ओळखली जाते.
रांगोळी मुख्यतः स्त्रियाच काढतात. शिरगोळय़ाचे चूर्ण किंवा भाताची फोलपटे जाळून केलेली पांढरी पूड ही रांगोळीची माध्यमे. याबरोबरच हळदकुंकू वा विविध प्रकारचे रंगही रांगोळीत वापरले जातात. टिंब, रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांचे विविध प्रतीकात्मक आकृतिबंध स्त्रिया हाताने काढतात. अलीकडे मात्र कागदाचे वा पत्र्याचे विविध छाप वापरूनही रांगोळी काढली जाते. रांगोळी ही शुभप्रद आणि अशुभनिवारक मानली जाते. म्हणून ती साधारणपणे दारापुढचे घराचे अंगण, देवघर, देवालये, तुळशीवृन्दावनासारखी पवित्र स्थाने तसेच पाटाभोवती, ताटाभोवती इ. विविध ठिकाणी काढली जाते. भोजनसमारंभ, धार्मिक विधी, सणसमारंभ व मंगलप्रसंगीही रांगोळी काढण्याची प्रथा आहे. घरासमोर दररोज सकाळी रांगोळी काढणारी कुटुंबे आढळतात.
रांगोळीची कला केव्हा उदयास आली, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि ही कला सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपासून प्रचलित असावी, असे दिसते. संस्कृतमध्ये ‘रंगवल्ली’ अशी संज्ञा आढळते. वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांच्या यादीत रांगोळीचा उल्लेख आहे. प्राचीन मराठी वाङ्मयातही रांगोळीचे अनेक ठिकाणी निर्देश आलेले आहेत.
रांगोळी काढण्यासाठी कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नसते. रांगोळीची पूड सामान्यपणे भरभरीत असते. त्यामुळे चिमटीतून ती सहजपणे सुटते. रांगोळीतील आकृतिबंध धार्मिक प्रतीकांचे निदर्शक असतात. सरळ रेषेपेक्षा वक्ररेषा ही अधिक कलात्मक मानली जाते. अशा वक्ररेषा आणि बिंदू, त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांतून विविध नक्षीदार आकृतिबंध साधले जातात. त्यांत स्वस्तिक, सूर्य, चंद्र, अष्टकोन, कमळ, त्याचप्रमाणे ‘सुस्वागतम्’ सारखे शद्ब यांचा समावेश होतो. याशिवाय ठिपक्मयांच्या रांगोळीतून मोर, कासव, कमळ इत्यादिंच्या प्रतिमा रेखाटल्या जातात. ठिपक्मयांची रांगोळी आकर्षक असते. रांगोळीचे आकृतिप्रधान व वल्लरीप्रधान असे दोन मुख्य भेद आहेत. आकृतिप्रधान रांगोळी राजस्थान, महाराष्ट्र, द. भारत आणि उ. प्रदेश या प्रदेशांत आढळते. वल्लरीप्रधान रांगोळी भारताच्या पूर्व भागात आढळते. तिच्यात फुलपत्री, वृक्षवल्ली व पशुपक्षी इत्यादींच्या रेखाटनास प्राधान्य असते.
दिवाळी हा भारतातील सर्वात महत्वाचा उत्सव आहे. हा संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि उत्साहात साजरा केला जातो. "लाइट्स फेस्टिव्हल" म्हणून ओळखल्या जाणा Diwali्या दिवाळी हा-दिवसांचा उत्सव असतो, ज्यात मित्र आणि कुटुंबीय एकत्र जमतात, त्यांच्या घरात मातीचे दिवे लावतात, गोड पदार्थांवर मेजवानी देतात, भेटवस्तू देतात, खेळ खेळतात आणि फटाके जळतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा उत्सव 'अमावस्या' किंवा चंद्राच्या रात्री साजरा केला जातो आणि नवीन वर्षाच्या पहाटेला उत्तर देतो. ही एक नवीन सुरुवात आहे. असा विश्वास आहे की देवी लक्ष्मी मध्यरात्रीच्या वेळी भक्तांच्या घरी भेट देतात आणि त्यांना संपत्ती आणि आनंद देतात. हे दिवे उत्सव असे म्हणतात कारण ते अंधारापेक्षा प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे, वाईटावर चांगले आहे आणि निराशेवर आशा आहे.